PM आवास योजना २०२४

How To Apply For PMAY

प्रधानमंत्री आवास योजना रजिस्ट्रेशन माहिती

प्रधानमंत्री आवास योजना २०२४” आपले “भारत सरकार” लोक कल्याणकारी योजना आणि अभियान राबवत असते. यांच्या माध्यामातून विविध स्थरातील जनतेला मदत करून त्यांचे जीवनमान कसे उंचावता येईल याकडे भर दिला जातो.याच जनहित विचारधारेतून “प्रधानमंत्री आवास योजना” केंद्र सरकारद्वारे २५ जून २०१५ रोजी सुरु करण्यात आली.या PMAY च्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि मध्यम वर्गीयांसाठी या योजनेच्या सहाय्याने मदत केली जात आहे. सर्व बेघर कुटुंब आणि ग्रामीण भागातील अस्थिर आणि मोडकळीस आलेल्या घरांमध्ये राहणाऱ्यांना मुलभूत सुविधांसह एक पक्के घर देणे हे या PMAY योजनेचे मुख्य उदिष्ट आहे. केंद्र सरकार मार्फत अशा अनेक महत्वकांक्षी योजना अमलात आणल्या जात असतात. त्यातील हि एक “प्रधानमंत्री आवास योजना” आहे.

प्रधानमंत्री आवास योजना रजिस्ट्रेशन माहिती– या PMAY योजनेच्या माध्यमातून शहरी त्याचप्रमाणे ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करून आपल्या देशातील पक्या घरांची कमतरता दूर करण्याचे उदिष्ट ठेवत आहे. या योजनेच्या सहाय्याने शहरी आणि ग्रामीण जनेतेला लाभ देण्यात येत आहे. त्यामुळे हि योजना दोन घटकात विभागली आहे. पीएमवाय- शहरी आणि पीएमवाय- ग्रामीण ज्यांना प्रधानमंत्री आवास योजना शहरी आणि प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण म्हणून ओळखले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी वार्षिक उत्पन्न , पात्रता, योजनेचे नियम आणि अटी, किती आर्थिक सहाय्य मिळते या सगळ्या प्रश्नांची उत्तरे, माहिती खालीलप्रमाणे मुद्देसुत दिली आहे. त्यामुळे तुम्हाला एकाच ठीकाणी संपूर्ण योजनेची सविस्थर माहिती मिळेल.

१) “प्रधानमंत्री आवास योजना” काय आहे

२) या योजनेसाठी किती अपेक्षित वार्षिक उत्पन्न असणे गरजेचे आहे.

३) PMAY योजनेसाठी पात्रता

४) या योजनेसाठी कोण अपात्र आहे

५) “प्रधानमंत्री आवास योजना” साठी कुठे अर्ज करायचा

६) PMAY साठी लागणारी कागदपत्रे

७) “प्रधानमंत्री आवास योजना” चे फायदे

८) PMAY-शहरी आणि ग्रामीण मधील फरक

९) या योजनेचे परिणाम

१०) PMAY योजने संदर्भात सामान्य प्रश्न

“प्रधानमंत्री आवास योजना” काय आहे :-

PMAY योजना सुरु करण्याचा हेतू हा सर्वांना परवडणारी घरे उपलब्ध करून देणे आहे. यामध्ये जी कुटुंब बेघर आहेत, जे निराधार आहेत, ज्यांची घरे मोडकळीस आलेली आहेत अशा सर्वांना या योजनेच्या माध्यमातून सहाय्य केले जात आहे. जेणेकरून कोणीही पक्क्या घरापासून वंचित राहणार नाही. प्रधानमंत्री आवास योजना हि विस्तृत असल्याने संपूर्ण देशामध्ये व्यवस्थित रित्या कामकाज करता यावे यासाठी या योजनेचे शहरी आणि ग्रामीण असे दोन घटक करण्यात आले आहे.

PMAY योजनेसाठी किती अपेक्षित वार्षिक उत्पन्न असणे गरजेचे आहे

प्रधानमंत्री आवास योजना या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे चार स्थरामध्ये विभागले आहे. ज्या लाभार्थी कुटुंबाचा समावेश हा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच EWS मध्ये होतो. अशा लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे तीन लाखांपर्यंत असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ज्या कुटुंबाचा समावेश हा कमी उत्पन्न गट म्हणजेच LIG मध्ये होतो. अशा लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे तीन लाख ते सहा लाख रुपयांपर्यंत असणे आवश्यक आहे. मध्यम उत्पन्न गट-१ (MIG-१) या उत्पन्न गटातील लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे सहा लाख ते बारा लाख रुपयांपर्यंत असणे आवश्यक आहे. आणि मध्यम उत्पन्न गट-२ (MIG-२ ) या स्थरातील लाभार्थी कुटुंबाचे उत्पन्न हे बारा लाख ते अठरा लाख रुपयांपर्यंत असणे आवश्यक आहे.

लाडकी बहिण योजना अपडेट :- visit this website

PMAY योजनेसाठी पात्रता

  • PMAY योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या देशाचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभार्थी हा दिलेल्या उपन्नाच्या मापदंडात बसणे गरजेचे आहे
  • या योजनेसाठी पती,पत्नी आणि अविवाहित मुलांचे कुटुंब हे ग्राह्य धरले जाऊ शकते पण त्यांचा नावे किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर भारतात कोणत्याही भागात पक्के घर नसावे.
  • जी कुटुंब निराधार आहेत, ज्यांच्याकडे पक्की घरे नाहीत, ज्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती दुर्बल आहे अशी सर्व कुटुंब या योजनेसाठी पात्र आहेत.

या योजनेसाठी कोण अपात्र आहे

  • ज्या कुटुंबाकडे तीन आणि चार चाकी वाहन असणारे अपात्र.
  • तसेच असे कुटुंब ज्यांच्याकडे यांत्रिक तीन किंवा चार चाकी कृषी उपकरण आहे असे सर्व.
  • सरकारी कर्मचारी असणारे कोणतेही कुटुंब अपात्र.
  • अशी कुटुंब कि त्या कुम्बातील कोणताही सदस्य हा दर महिन्यांना १५ हजार रुपयांपेक्षा जास्त कमावतो.
  • त्याचप्रमाणे ज्यांचाकडे किसान क्रेडीट कार्ड हे ५०००० रुपये पेक्षा जास्त आहे.
  • अशी कुटुंब जी आयकर भरतात.
  • ज्यांचाकडे २.५ एकर किंवा त्याहून जास्त अधिक सिंचित जमिनीचे मालक अपात्र.

“प्रधानमंत्री आवास योजना” साठी कुठे अर्ज करायचा

“प्रधानमंत्री आवास योजना” या योजनेचा लाभ हा आपल्याला online तसेच offline घेता येतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड असणे गरजेचे आहे. आधार कार्ड शिवाय apply करता येत नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार नंबर जवळ ठेवा. सर्व प्रथम “प्रधानमंत्री आवास योजना” च्या वरील official संकेतस्थळाला भेट द्या.समोर आलेल्या homepage वर नागरिक मुल्यांकन ( citizen assessment ) या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला पुढील येणाऱ्या चार पर्याय पैकी एक निवडा व अर्ज भरा.offline अर्ज करण्यासाठी आपल्या नजीकच्या सामान्य सेवा केंद्रावर जाऊन अर्ज करता येतो. तसेच ग्रामीण भागात ग्रामपंचायत मध्ये जाऊन पात्र कुटुंब अर्ज करू शकतात. आणि आवश्यक कागदपत्रे जमा करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

PMAY साठी लागणारी कागदपत्रे

१) लाभार्थी कुटुंबातील ज्याचा नावे नोंदणी केकेली आहे त्या सदस्य चे आधार कार्ड

२) रेशन कार्ड

३) उत्पन्न दाखला

४) पासपोर्ट साईज फोटो

५) pan कार्ड

“प्रधानमंत्री आवास योजना” चे फायदे

केंद्र सरकारच्या या महत्वकांक्षी योजनेमुळे संपूर्ण देशातील निराधार, बेघर कुटुंबांना हक्काचे पक्के घर मिळत आहे.या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण तसेच शहरी भागातील कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळाल्यामुळे, मिळणाऱ्या आर्थीक सहाय्यातून पक्के व त्यांच्या स्वप्नातील घरे बांधण्यास मदत होत आहे. आर्थिक दृष्ट्या दर्बल असणाऱ्या तसेच ज्यांची घरे मोडकळीस आलेल्या कुटुंबांना या योजनेमुळे नवीन घर तसेच जुने घर सुधारण्यास मदत मिळत आहे. तसेच शहरात आपले घर असावे असे प्रत्येक सामान्य माणसाला वाटते, ते या योजनेमुळे शक्य झाले आहे. या योजनेतून शहरात घर घेण्यासाठी केलेल्या कर्जावर सूट दिली जात आहे.

PMAY-शहरी आणि ग्रामीण मधील फरक

PMAY-शहरी – या योजनेतील शहरी गटातील लाभार्थी कुटुंबांना नवीन घरासाठी दिलेल्या आर्थिक निकषावर लाभ दिला जातो. शहरात घरांची किंमत जास्त असल्याने या गटातील लाभार्थ्यांना ग्रामीण पेक्षा जास्त सहाय्य दिले जाते. तसेच शासनामार्फत सबसिडी दिली जात आहे. तसेच सरकारच्या माध्यमातून या योजनेतर्फे वैयक्तिक बांधकाम करणाऱ्यांशी सामंजस्याने झोपडपट्टी पुर्नवसन करून पक्की घरे उपलब्ध करून दिली जात आहेत. आणि PMAYग्रामीण या योजानेतील गटात लाभार्थी कुटुंबाला सपाट भाग असेल तर १.३ लाख तर डोंगराळ भाग असेल तर १.५ लाख मिळतात. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी गावातील ग्रामपंचायत मध्ये जाऊन अर्ज करावा लागतो.

या योजनेचे परिणाम

“प्रधानमंत्री आवास योजना” या केद्र सरकारच्या योजनेमुळे संपूर्ण देशातील सामान्य कुटुंबांना पक्की घरे बांधून दिली जात आहेत. त्यामुळे कोणीही पक्क्या घरापासून वंचित राहू शकत नाही. ज्या कुटुंबाना पक्के घर बांधता येत नाही अशा कुटुंबासाठी PMAY योजना वरदान ठरत आहे. तसेच शहरातील कुटुंबांना या या योजनेच्या माध्यमातून कर्जावर सबसिडी दिली जात आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाला या योजनेचा लाभ घेता येत आहे. परतू या योजनेचे उपन्न संदर्भात काही मापदंड दिले आहेत. जे या मापदंडात बसतात, त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येत आहे.

PMAY योजने संदर्भात सामान्य प्रश्न

१) PMAY साठी कोण पात्र आहे?

उत्तर :- या योजनेसाठी १८ लाखांपर्यंत उत्पन्न असणे गरजेचे आहे. तसेच देशातील कोणत्याही भागात पक्के घर नसावे.

2) PMAY अजूनही सक्रीय आहे का ?

उत्तर :- केंद्रीय मंत्रिमंडळाने ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत योजना सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

३) PMAY योजनेसाठी online अर्ज करू शकता का ?

उत्तर :- होय, वरील दिलेल्या अधिकृत सांकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकता.

४) एकटी महीला या योजनेसाठी पात्र असते का ?

उत्तर :- PMAY योजनेसाठी एकटी महिला सदस्याची घर मालक म्हणून नोंदणी असणे आवश्यक आहे.

५) मला कर्जाशिवाय PMAY योजनेची सबसिडी मिळू शकते का ?

उत्तर :- नाही. कर्ज केल्याशिवाय तुम्हाला सबसिडी मिळणार नाही.

६) PMAY योजनेसाठी सबसिडी कशी ठरवली जाते ?

उत्तर :- तुमचे आर्थिक वार्षिक उत्पन्न, तुमची लाभार्थी श्रेणी आणि तुम्हाला मिळणारे कमाल गृहकर्ज अनुदान रक्कम यावर ठरते.

७) “प्रधानमंत्री आवास योजना”अंतर्गत किती घरे बांधली गेली आहेत ?

उत्तर :- “प्रधानमंत्री आवास योजना” या योजनेंतर्गत PMAY- G सरकारने २.९५ घरे बांधण्याचे महत्वकांक्षी लक्ष गाठले आहे.तसेच अजून २.९४ कोटी घरे मंजूर झाली आहेत. यामुळे ग्रामीण भागातील कुटुंबाचे राहणीमानात लक्षणीय सुधारणा होण्यास मदत होत आहे.

८) “प्रधानमंत्री आवास योजना” सबसिडी मंजूर होण्यासाठी किती कालावधी लागतो ?

उत्तर :- या योजानेची सबसिडी प्राप्त होण्यासाठी साधारण ३ ते ४ मिहीन्याचा कालावधी लागतो.

९) PMAY- शहरी आणि ग्रामीण मध्ये काय फरक आहे ?

उत्तर :- EWS लाभार्थी कुटुंब हे ३२२ चौरस फुट कार्पेट क्षेत्र असलेल्या घरांसाठी पात्र आहेत. तसेच अल्प उत्पन्न गटासाठी हे चटईक्षेत्र ६४५ चैरस फुट आहे. तर ग्रामीण भागातील घरे हि कमीत कमी २६९ चौरस फुट क्षेत्रात असतील.

१०) PMAY योजनेचे किती प्रकार आहेत ?

उत्तर :- PMAY या योजनेचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे PMAY- शहरी आणि दुसरा म्हणजे PMAY- ग्रामीण असे आहेत.

आपल्या संकेतस्थळाचा शासनाशी कोणताही संबंध नाही. या संकेतस्थळाच्या माध्यमातून शासंमार्फात राबवण्यात येणाऱ्या योजनांची संपूर्ण माहिती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. जेणेकरून तुम्हाला एकाच ठिकाणी सर्व माहिती उपलब्ध होईल. योजनेचा लाभ घेण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळाला अवश्य भेट द्या.