“प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना” :- शेतीला आपल्या देशाचा ‘कणा‘ म्हणून संबोधले जाते. कोरोनाच्या संकट काळात सगळे उद्योग-धंदे ठप्प झाले होते, पण शेतकरी मात्र शेतात ठामपणे काम करत होते. अशा आपल्या शेतकरी बांधवांसाठी केंद्र सरकारने PM Kisan Sanman Nidhi Yojana आणली आहे. “प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना” हि योजना भारत सरकारने आपल्या शेतकरी बांधवाना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने सुरु केली आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१८ मध्ये या योजनेची घोषणा केली होती. परंतु ही योजना ०१ फेब्रुवारी २०१९ मध्ये संपूर्ण देशामध्ये राबवण्यास सुरुवात करण्यात आली. सदर योजना शासन निर्णयान्वये कृषी विभाग, महसूल विभाग व ग्राम विकास विभाग यांच्या संयुक्त समन्वयाने राज्यात राबवण्यात येत आहे.
PM Kisan Sanman Nidhi Yojana च्या माद्यमातून अल्प आणि अत्यल्प शेती भूधारकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी तसेच शेतीसाठी लागणारी अवजारे, बियाणे, खते आणि इतर शेती उपयोगी साहित्य घेण्यासाठी मदत होईल, त्याचप्रमाणे सावकारांच्या विळख्यातून सुटका करण्याच्या मुख्य हेतूने हि योजना संपूर्ण देशात राबवण्यात येत आहे. या योजनेतून लाभार्थी शेतकऱ्याला एका वर्षात ६००० रुपये दिले जात आहेत. हि रक्कम वर्षातून तीन हप्तात शेतकऱ्याच्या थेट बँक खात्यात जमा केली जाते. जेणेकरून आपले शेतकरी बांधव तीनही शेती हंगामात मिळालेल्या रक्कमेचा शेतीसाठी योग्य वापर करतील. PM Kisan योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण पात्र आहे, अर्ज कुठे करायचा,कोणते नियम व अटी आहेत या संदर्भातील सविस्थर माहिती आपण खालीलप्रमाणे दिली आहे.
१) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना कोणासाठी आहे २) PM Kisan Sanman Nidhi Yojana चा लाभ घेण्यासाठी पात्रता ३) PM Kisan योजनेसाठी कोण अपात्र ४) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठे अर्ज करायचा ५) योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ६) PM Kisan योजनेचे शेतकऱ्याना होणारे फायदे ७) या योजनेतून शेतकऱ्यांना कशा प्रकारे लाभ होणार आहे ८) योजनेत येणाऱ्या अडचणी व मर्यादा ९) PM Kisan योजनेचा होणारा परिणाम १०) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने संदर्भात समोर येणारे काही प्रश्न
“प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना” कोणासाठी आहे :-
“PM Kisan योजना” हि केंद्र सरकारची महात्वाकांक्षी योजनांपैकी एक योजना आहे. आणि देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी हि योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांकडे २ हेक्टर पेक्षा कमी शेती शेत्र आहे. अशा शेतकऱ्याना याचा लाभ दिला जाणार आहे.
“PM Kisan Sanman Nidhi Yojana” चा लाभ घेण्यासाठी पात्रता :-
या योजनेचा लाभ घेण्यासाठी भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
शेतकऱ्याकडे २ हेक्टर पेक्षा कमी शेती क्षेत्र असणे आवश्यक आहे.
PM Kisan योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या जे शेतकरी कुटुंब दुर्बल आहे अशा शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते आहे.
जास्त शेती भूधारक, सरकारी कर्यामचारी, आयकर भरणारे आणि निववृत सरकारी अधिकारी यांना चा लाभ मिळत नाही.
ज्या व्यक्तींचे निवृत्ती १०००० पेक्षा जास्त असणारे भूधारक
आजी-माजी आमदार आणि खाजदार
“प्रधानमंत्री किसान सन्मान निधी” योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठे अर्ज करायचा :-
PM Kisan योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी खालील पद्धतीचा अवलंब करावा :-
१) सर्व कागदपत्रे घेऊन तलाठी कार्यालयात नाव नोंदणी करणे.
२) कॉमन सर्विस सेंटर मध्ये जाऊन योजनेसाठी नाव नोंदणी करू शकतो .पण त्यासठी ठराविक शुल्क द्यावे लागते.
३) आपण स्वत: “PM Kisan” संकेतस्थळावर जाऊन नावनोंदणी करू शकतो. त्यासंदर्भात संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहे. :-
सर्व योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी.
मोबाईल किवा संगणकाच्या अधिकृत योजनेच्या संकेतस्थळावर गेल्यावर शेतकरी कॉर्नर हा पर्याय दिसेल, त्या पर्यायावर क्लिक करणे.
पुढे तुम्हाला नवीन शेतकरी नोंदणी हा पर्याय निवडायचा आहे.हा पर्याय निवडल्यावर आपल्याला या योजनेचा अर्ज दिसेल.
आपल्या समोर दिसणाऱ्या अर्जामध्ये आधार कार्ड नंबर आणि इतर विचारलेली माहिती विचारपूर्वक भरावी.
सगळी माहिती व्यवस्थित भरून झाल्यावर सबमिट या पर्यायावर क्लिक करा.
अशा प्रकारे PM Kisan योजनेचा अर्ज करता येतो.
केलेल्या अर्जाचा पुरावा असावा यासाठी नोदणी केलेल्या अर्जाची प्रिंट काढून घ्यावी.
ज्यांना online अर्ज करता येत नाही अशांनी आपल्या जवळील ग्रामपंचायत, कृषी कार्यालय किवा सरळ सेवा केंद्रामध्ये जाऊन या योजनेसाठी नोंदणी करावी.
प्रत्येक तालुक्यातील कृषी कार्यालयात या योजनेसाठी स्वतंत्र कर्मचारी ठेवले आहेत.
PM Kisan योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :-
आधार कार्ड
जमिनीचा ७/ १२ उतारा
जमिनीचा ८अ उतारा
राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक
रेशन कार्ड
मोबाईल नंबर
“PM Kisan” योजनेचे शेतकऱ्याना होणारे फायदे :-
“प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना” या केंद्र शासनाच्या महत्वकांक्षी योजनेमुळे देशातील तळा-गाळातील आर्थिक दृष्ट्या दुर्बर शेतकऱ्यांना या योजनेच्या सहाय्याने मदत होत आहे.
जे लाभार्थी शेतकरी बांधव आहेत त्यांचा बँक खात्यात थेट पैसे जमा होतात.त्यामुळे शेतकऱ्यांना त्यासाठी सारखे सरकारी कार्यालयात जावे लागत नाही.
“PM Kisan” योजनेतून आपल्या शेतकरी बांधवाला वर्षाला ६००० रुपये मिळतात.
मिळणरी रक्कम हि वर्षातून तीन वेळा विभागून मिळते.त्यामुळे शेतीच्या तीनही हंगामात मिळणारे पैसे वापरता येतात.
तसेच शेतीसाठी लागणाऱ्या पैशासाठी शेतकरी सावकारांचा सहारा घेत असे. परंतु या योजनेमुळे शेतकरी सावकारांच्या विळख्यातून बाहेर पडण्यास मदत होत आहे.
या “PM Kisan” योजनेच्या माध्यामातून सामान्य शेतकरी बांधवांना आर्थिक सहाय्य मिळाल्याने त्यांचावरील येनारा आर्थिक भार काही प्रमाणात कमी होण्यास मदत होत आहे.
या योजनेतून शेतकऱ्यांना कशा प्रकारे लाभ होणार आहे :-
“प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना” माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा केली जाणार आहे. त्यामुळे कुठेही या योजनेत कोणत्याही प्रकारचे चुकीचे व्यवहार होणार नाही. तसेच या योजनेसाठी सर्व गोष्टी या online असल्याने या योजनेमध्ये पारदर्शता दिसून येत आहे.
“PM Kisan”योजनेत येणाऱ्या अडचणी व मर्यादा :-
तांत्रिक अडचणी :- लाभार्थी शेतकरी जेव्हा योजनेसाठी नोंदणी करतात तेव्हा अनेक वेळा आधार कार्ड आणि बँक लिंकमध्ये समस्या निर्मात होते.
जनतेतील अपुरी जागरुकता :- “PM Kisan” योजनेसंदर्भात अजूनही जनतेमध्ये पुरेशी जागरुकता नाही आहे.
लहान रक्कम :- या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारी रक्कम ६००० रुपये हि शेतकऱ्यांच्या गरजेच्या तुलनेत अत्यल्प आहे.
अपात्र लाभार्थींचा समावेश :- काही प्रकरणांमध्ये असे आढळून आले कि अपात्र लाभार्थी सुद्धा या योजनेचा लाभ गेताना निदर्शनास आले आहे.
“PM Kisan” योजनेचा होणारा परिणाम :-
“प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना” योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या निधीमुळे आपल्या शेतकरी बांधवांच्या आर्थिक स्थिरतेत काही प्रमाणात सुधारणा होण्यास मदत होत आहे. या योजनेतून प्राप्त होणाऱ्या निधीच्या मदतीने शेतीसाठी लागणारा आर्थिक भार कमी झाला आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील विकासालाही चालना मिळाली आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने संदर्भात समोर येणारे काही प्रश्न :-
१) या योजनेसाठी कोण पात्र आहे ?
उत्तर :- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी पात्र आहेत.
२) या योजनेतून पैसे कसे मिळतात ?
उत्तर:- या योजनेच्या माध्यमातून आपल्या लाभार्थी शेतकरी बांधवांना वर्षातून तीन हप्त्यामध्ये पैसे दिले जातात. दर चार महिन्यांनी २००० रुपये लाभार्थीच्या खात्यात थेट जमा केले जातात. त्यामुळे वर्षाला ६००० रुपये योजनेच्या माध्यमातून दिले जात आहेत.
३) अर्ज कसा करावा ?
उत्तर :-“PM Kisan”योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्जामध्ये तुमचा वैयक्तिक तपशील जसे कि नाव, पत्ता, आधार नंबर, फोन नंबर इत्यादी भरा आणि सबमिट करा.
४) “PM Kisan” मध्ये जमीन नोंदणी ओळखपत्र काय आहे ?
उत्तर :- किसान जमीन नोदणी आयडी म्हणजेच जमिनीच्या विशिष्ट तुकड्यावर नियुक्त केलेला एक अनन्य क्रमांक आहे.
५) “प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना”चा स्टेटस कसा चेक करणे ?
उत्तर :- या योजनेचा स्टेटस चेक करण्यासाठी अधिकृत website वर जाऊन बेनिफिशरी स्टेट्स वर क्लिक करून तिथे आधार कार्ड नंबर टाकावाआणि capcha कोड टाकावाआणि रजिस्टर मोबाईल नंबरवर येणारा OTP टाकावा. आणि हप्त्याचे तपशील दिसतील.
6) “PM Kisan” योजनेसाठी किती जमीन असणे आवश्यक आहे ?
उत्तर :- या योजनेचा लाभ घेण्यासाठी २ हेक्टर जमीनिची अट होती पण नंतर हि अट शिथिल करण्यात आली आहे,त्यामुळे इतर नियमांमध्ये जर शेतकरी बसत असेल तर त्यांना योजनेचा लाभ देण्यात येत आहे.
७) “PM Kisan” योजनेसाठी KYC कशी पूर्ण करावी ?
उत्तर :-“PM Kisan” योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. तिथे शेतकरी कॉर्नर या पर्यायावर जाऊन ई-केवायसी हा पर्याय निवडा. पुढे तुमचा आधार नंबर, मोबाईल नंबर आणि प्राप्त झालेला OTP प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
“प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना” हि भारत सरकारची कल्याणकारी योजना आहे. या योजनेच्या सहाय्याने शेतकऱ्यांना वर्षातून तीन वेळा २००० रुपये मिळतात. म्हणजेच एकूण ६००० रुपये मिळतात. त्यामुळे काही प्रमाणात शेतीचा आर्थिक भार कमी होण्यास शेतकरी बांधवांना मदत होत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवावरील कर्जाचे प्रमाण कमी होत आहे. तसेच मिळणारी रक्कम तीन शेती हंगामात मिळत असल्याने त्या रक्कमेचा शेतकरी शेतीसाठी लागणाऱ्या वस्तू घेण्यासाठी करतय आहे. हि योजना शेतकऱ्यांसाठी आर्थिक स्तेर्य आणणारी आहे.