सुकन्या समृद्धी योजनेतून मिळणार ५० लाखांपेक्षा जास्त धनराशी
Sukanya Samrudhi Yojana in Marathi
Sukanya Samrudhi Yojana हि “बेटी बचाव, बेटी पढाओ” या अभियानामार्फात सुरु करण्यात आली आहे. आपले भारत सरकार तसेच राज्य सरकार लोक कल्याणकारी योजना राबवत असतात. अशाच योजनेतील हि एक ”सुकन्या समृद्धी” योजना आहे. या योजनेचा माध्यमातून मुलींच्या पालकांना तिचा भविष्यासाठी शिक्षण आणि लग्नासाठी होणारा खर्च उभारण्यासाठी प्रोत्साहन मिळते. हि योजना २२ जानेवारी २०१५ ला सुरु करण्यात आली आहे. प्रत्येक आई – वडिलांना आपल्या मुलींना चांगले शिक्षण द्यायचे असते त्यांचे भविष्य उत्तम करायचे हे एकच धेय्य असते. पण ते प्रत्येक पालकांना शक्य होत नाही. कारण प्रत्येकाची आर्थिक परस्थिती सारखी नसते. अशा सर्व पालकांसाठी हि योजना सरकारने आणली आहे. जेणेकरून प्रत्येक आई-वडील आपल्या मुलींना चांगले शिक्षण देऊ शकेल, त्यांचे भविष्य उत्तम करू शकतील आणि त्यांच्या विवाहासाठी एक चांगली धनराशी जमा करतील.

Sukanya Samrudhi Yojana चा माध्यमातून मुलीच्या जन्मापासून ते मुलगी १० वर्ष होई पर्यंत तिचे आईवडील किवा कायेशीर पालक बँकेत किवा पोस्ट ऑफिस मध्ये मुलीचा नावाने खाते उघडू शकतात . ऐका कुटुंबात दोन मुलींनाच या योजनेचा लाभ मिळतो. याला अपवाद असा कि ऐका वेळी जुळ्या मुली झाल्या तर त्या कुटुंबातील तीन मुलींना या सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ मिळू शकतो. या योजनेत मुलीच्या पालकांना १४ वर्षापर्यंत पैसे जमा करायचे आहेत. मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाले कि ५०% रक्कम मिळते. तसेच मुलीचे वय २१ वर्षे पूर्ण झाली कि संपूर्ण रक्कम मिळते. या योजनेत ऐका आर्थिक वर्षात कमीत कमी २५० ते जास्तीत जास्त १.५ लाख रुपये एवढी गुंतवणूक करता येऊ शकते. या योजनेत जास्त गुंतवणूक केल्यास जवळ जवळ ५० लाखांपर्यंत धनराशी मिळू शकते. तसेच गुंतवणूक केलेल्या धनराशीवर ७.५ ते ८ टक्के पर्यंत व्याज दिले जात आहे. या योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. जेणेकरून एकाच ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती उपलब्ध होईल व तुम्ही योग्य प्रकारे योजनेचा लाभ घेऊ शकाल.

Sukanya Samrudhi Yojana च्या माध्यामातून समाजात होणारी मुलीची भृणहत्या कमी व्हावी, मुलींना उज्ज्वल भविष्य मिळावे, उत्तम शिक्षण, आरोग्य,त्याना आपल्या पायावर उभे राहता यावे या मुख्य हेतूने सरकार ‘ बेटी बचाओ, बेटी पाढाओ’ या चळवळीच्या माध्यमातून हि योजना २०१५ पासून राबवत आहे. या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, कागदपत्र कोणती लागतात, कुठे अर्ज करायचा, या योजनेचे फायदे या संदर्भात सर्व माहिती आपल्याला खालील प्रमाणे मिळेल.
- सुकन्या समृद्धी योजना कोणासाठी आहे
- या योजनेसाठी कोण पात्र आहे
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठे अर्ज करावा
- सुकन्या समृद्धी योजनेसाठी कोणती कागदपत्र लागतात
- या योजनेचे मिळणारे फायदे
- किती गुंतवणूक करणे आवश्यक आहे
- या योजनेचा परिपक्व कालावधी किती आहे
- Sukanya Samrudhi Yojana in marathiमध्ये गुंतवणूक केल्यास आयकर सवलत संदर्भात माहिती
- Sukanya Samrudhi Yojana चे नवीन अपडेट
- Sukanya Samrudhi Yojana संदर्भात प्रश्न
Sukanya Samrudhi Yojana :- visit this official website |
सुकन्या समृद्धी योजना कोणासाठी आहे :-
Sukanya Samrudhi Yojana हि योजना फक्त मुलींसाठी आहे. योजनेच्या माध्यमातून सरकार ज्यांची आर्थिक परिस्थिती साधारण आहे, जे पालक मोठ्या प्रमाणात आपल्या मुलीच्या शिक्षणावर, तिच्या लग्नामध्ये एकाच वेळी खर्च करू शकत नाहीत. अशा पालकांसाठी हि योजना आणली आहे. ज्यांना आपल्या मुलींना भविष्यात उत्तम शिक्षण द्यायचे आहे, तिचा विवाह उत्तम प्रकारे करायचा आहे, पण ते मोठ्या प्रमाणात खर्च करू शकत नाहीत. जर त्यांनी या योजनेत गुंतवणूक केली तर या योजनेचा माध्यमातून मुलींच्या शिक्षणासाठी मदत मिळू शकते. तसेच तिचा लग्नासाठी सुद्धा धनराशी मिळते.
या योजनेसाठी कोण पात्र आहे :-
Sukanya Samrudhi Yojana या योजनेच्या माध्यमातून ऐका कुटुंबातील फक्त दोन मुलींना लाभ मिळतो. पण ऐका वेळी जर जुळ्या मुली झाल्या तरच त्या कुटुंबातील तीन मुलींना लाभ मिळू शकतो. समजा कुटुंबात तीन किवा त्यापेक्षा जास्त मुली असतील तर पहिल्या दोन मुलींना या योजनेचा लाभ मिळू शकतो. प्रत्येक मुलीच्या नावे वैयक्तिक खाते उघडावे लागते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठे अर्ज करावा :-
Sukanya Samrudhi Yojana साठी आपल्या जवळील राष्ट्रीयकृत बँकेत जाऊन या योजनेचा अर्ज घ्यावा. मुलीचे आईवडील किवा कायदेशीर पालक मुलीचा नावे खाते उघडू शकतात. तसेच नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा या योजनेचे खाते मुलीचा नावे उघडता येते.
सुकन्या समृद्धी योजनेसाठी कोणती कागदपत्र लागतात :-
१ ) मुलीचे जन्म प्रमाणपत्र
२) पालक किंवा कायदेशीर पालकांचा पत्ता पुरावा
३) पासपोर्ट
४) ड्रायविंग लायसन
५) रेशन कार्ड
६) लाईट बिल/टेलिफोन बिल
७) आधार कार्ड
“प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना:- visit this website |

Sukanya Samrudhi Yojana चे मिळणारे फायदे :-
- या योजनेच्या गुंतवणुकीवर सर्वात जास्त व्याज दर मिळते. आपण बँकेत ठेवलेली रक्कम किंवा केलेली FD यांचापेक्षा जास्त व्याज दर आपल्याला या योजनेतून मिळतो. सदर आर्थिक वर्षात साधारण ७.५ ते ८% पर्यंत व्याज दर मिळत आहे.
- या योजनेचा माध्यमातून केलेली गुंतवणूक हि इतर केलेल्या गुंतवणुकीपेक्षा सुरक्षित आहे.
- या योजनेच्या माध्यमातून पालकांनी केलेली गुंतवणूक हि मुलीच्या उच्च शिक्षणासाठी उपयोगी पडू शकते. या सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेतल्यास त्यंना मुलीचा लग्नाच्या खर्चाची चिंता करण्याची गरजच नाही.
- या योजनेच्या माध्यमातून मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाले कि तिचा शिक्षणासाठी ५०% रक्कम काढता येते.
- या योजनेतील गुंतवणुकीवर कोणत्याही प्रकारचे आयकर लागत नाही. हि गुंतवणूक पूर्णपणे आयकर मुक्त आहे
किती गुंतवणूक करणे आवश्यक आहे :-
Sukanya Samrudhi Yojana in Marathi या योजनेचा माध्यमातून सुरुवातीला किमान १००० रुपये भरावे लागत होते परंतु या योजनेचा लाभ सर्वांना घेता यावा यासाठी मुलीचे पालक कमीत- कमी ऐका वर्षात २५० रुपये ते जास्तीत जास्त १.५ लाख पर्यत गुंतवणूक करू शकतात. या योजनेत उत्तम प्रकारे गुंतवणूक केल्यास साधारण ५० लाखांपर्यंत धनराशी प्राप्त होऊ शकते. जर वार्षिक किमान रक्कम न ५० रुपये दंड भरावा लागतो.
या योजनेचा परिपक्व कालावधी किती आहे :-
या योजनेत मुलीच्या पालकांना १४ वर्षापर्यंत पैसे भरावे लागतात. आणि २१ व्या वर्षी हि योजना परिपक्व होते. म्हणजेच २१ व्या वर्षी पूर्ण परतावा मिळतो. उदा. मुलीचा पालकांनी मुलीचे वय १० वर्षे चालू असताना या योजनेचे खाते चालू केले. तर ते पालक पुढील १४ वर्षे ठराविक रक्कम जमा करणार. त्यानंतर मुलगी ३१ वर्षाची होईल तेव्हा तिला पूर्ण रक्कम मिळेल.
Sukanya Samrudhi Yojana मध्ये गुंतवणूक केल्यास आयकर सवलत संदर्भात माहिती :-
या योजनेच्या माध्यमातून केलेल्या गुंतवणुकीवर आयकर अधिनियम ८०C नुसार कोणत्याही प्रकारचा आयकर लागत नाही. या योजनेतून केकेली गुंतवणूक हि पूर्णपणे आयकर मुक्त आहे.
Sukanya Samrudhi Yojana चे नवीन अपडेट :-
१) Sukanya Samrudhi Yojana चे खाते difault होणार नाही. सुकन्या समृद्धी योजनेमध्ये किमान नियमित पैसे न भरल्यास ते खाते difault केले जायचे व पुन्हा दंड भरल्यावर चलू केले जायचे. पण आता खाते difault केले जात नाही . तसेच खाते बंद झाल्यास ते योजना mature झाल्यावर व्याजासकट सर्व पैसे मिळतात.
२) कुटुंबातील तिसऱ्या मुलीच्या खात्यावर आयकर सूट दिली जाणर आहे.
३) Sukanya Samrudhi Yojana चे खाते हे बंद करता येणार:- या योजनेचे खाते कालावधी पूर्ण होण्याच्या आधी बंद करता येणार आहे. जर मुलीचे पालक यांचा मृत्यू झाल्यास खाते बंद करता येऊ शकते, तसेच खातेदाराचा मृत्यू झाल्यास खाते बंद करता येते. या परिस्थितीमध्ये मृत्यूचा दाखला जमा करून जमा असलेल्या धनराशीवर चालू व्याजदर प्रमाणे रक्कम मिळू शकते. तसेच पालक वार्षिक रक्कम भरण्यास असमर्थ असतील तरीही खाते बंद करता येते.व खाते mature झाल्यावर व्याजासकट जमा रक्कम मिळते.
Sukanya Samrudhi Yojana संदर्भात प्रश्न
१) सुकन्या योजनेत किती वेळा पैसे जमा करू शकतो ?
उत्तर :- एका महिन्यात किवा दिलेल्या आर्थिक वर्षात कितीही वेळा पैसे जमा करता येतात. यावर कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही. पालक एका महिन्यात २५० ते १.५ लाख पर्यंत रक्कम जमा करू शकतात.
२) मुलींसाठी सुकन्या policy काय आहे ?
उत्तर :- या सुकन्या policyच्या माध्यमातून मुलीच्या पालकांनी गुंतवणूक केल्यास मुलीच्या भविष्यातील शिक्षणासाठी ५०% रक्कम policy mature होण्याच्या आधी काढता येतात. तसेच policy चा कालावधी पूर्ण झाला कि संपूर्ण रक्कम मिळते. त्यामुळे त्यंचे भविष्य उज्ज्वल होण्यासाठी हि योजना मुलींसाठी अत्यंत महत्वाची आहे.
३) सुकन्या समृद्धी खाते कोणत्या वयात उघडावे लागते ?
उत्तर :- SSY चे खाते हे मुलीचा जन्म झाल्यापासून ते मुलगी १० वर्षे होईपर्यंत खाते उघडता येते.
४) SSY चे खाते दुसऱ्या ठिकाणी ट्रान्स्फर करता येते का ?
उत्तर :- होय. सुकन्या समृद्धी योजनेचे SSY खाते दुसऱ्या शहरातील राष्ट्रीयकृत बँकेत तसेच पोस्ट ऑफिसमध्ये उघडता येते. त्यासाठी ज्या टिकाणी खाते चालू केले आहे तिथे जाऊन खाते ट्रान्स्फर करण्याचा अर्ज घेऊन भरावा व त्यामध्ये कोणत्या टिकाणी बँकेत खाते उघडणार आहे त्याचा पत्ता लिहावा व खात्याची कागदपत्रे जमा कारावी. त्यानंतर सर्व छाननी करून तुम्हाला खाते बंद करून दिले जाते. व नवीन ठिकाणी खाते उघडून त्यावर तुमची आधीची सर्व रक्कम जमा दिसेल.
५) सुकन्या समृद्धी योजनेतील SSY गुंतवणूक सुरक्षित आहे का ?
उत्तर :- SSY या योजनेतील गुंतवणूक हि इतर गुंतवणूकीपेक्षा नक्कीच सुरक्षित आहे. कारण हि सरकारी योजना आहे. व याची हमी सरकार घेते आहे.
६ ) सुकन्या योजनेतील SSY गुंतवणुकीवर इतर तुलनेत जास्त व्याजदर मिळतो का
उत्तर :- होय, नक्कीच . या SSY योजनेत गुंतवणूक केल्यास इतर ठिकाणी केलेल्या गुंतवणुकीपेक्षा जास्त व्याजदर मिळतो.
केंद्र शासनामार्फत राबवण्यात आलेली सुकन्या समृद्धी योजना SSY हि लघु बचत योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश हा ‘ मुलगी वाचवा, मुलगी शिकवा ‘ हा आहे. तसेच समाजातील मुलींचे राहणीमाण उंचवावे, त्यांना उत्तम आरोग्य , शिक्षण मिळावे तसेच मुलीचा पालकांना तिचा लग्नासाठी खर्च करण्यासाठी एक योग्य रक्कम मिळावी, जेणेकरून ते उत्तमरित्या तिला भवितव्य देऊ शकतील. हि योजना अशा पालकांसाठी एक उत्तम लघु बचत योजना आहे.