“मुख्यमंत्री लाडकी बहिणींना मिळणार १८००० रुपये“
लाडकी बहिण योजना माहिती
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” हि महाराष्ट्र राज्याची एक महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेच्या सहाय्याने आपल्या राज्यातील महिलांना व मुलीना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे, त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, महिलांना त्यांच्या आरोग्याची काळजी व पोषणामध्ये सुधारणा करता यावी , त्यांना आर्थिक स्वतंत्र मिळावे, तसेच कुटुंबातील त्यांची भूमिका मजबूत करता यावी या सर्व उद्देशांनी महाराष्ट्र शासनाने २८ जून २०२४ रोजी मान्यता दिली होती. व जुलै महिन्यापासून हि योजना संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात आली आहे. लाडकी बहिण योजना हि पूर्णपणे महिलांसाठी सुरु केली आहे. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” हि मध्य प्रदेशच्या धरतीवर महाराष्ट्रात आण्यात आली आहे.

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना व मुलींना महिन्याला १५०० रुपये देण्यात येणार आहेत. म्हणजेच एका वर्षाला १८००० रुपये मिळणार आहेत. यासाठी वयाची मर्यादा हि २१ ते ६० ठेवण्यात आली आहे. तसेच लाभ घेणाऱ्या महिलेचे किंवा मुलींचे वार्षिक आर्थिक उत्पन्न हे २.५ लाखांपेक्षा जास्त नसावे. तसेच लाभार्थी या महाराष्ट्राच्या रहिवाशी असणे आवश्यक आहे. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहाना योजनेतून तेथील महिलांना १००० रुपये देत होती. या योजनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना च्या माद्यमातून महिन्याला १५०० रुपये लाभार्थी महिलांना आणि मुलींना देत आहे.सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणे, योजनेच्या अटी व मर्यादा, योजनेचे फायदे, योजनेसाठी पात्रता या संदर्भात सविस्थर माहिती पुढीलप्रमाणे देण्यात आली आहे.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना कोणासाठी आहे
- योजनेचा मुख्य उद्देश
- लाडकी बहिण योजनेसाठी पात्रता
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना साठी कोण अपात्र आहे
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना लभासाठी लागणारी कागदपत्रे
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना साठी अर्ज कुठे करणे
- लाडकी बहिण योजनेसाठी ‘नारीशक्ती app च्या द्वारे apply करण्याची माहिती
- लाडकी बहिण योजनेचे फायदे
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना चे परिणाम
- लाडकी बहिण योजनेचे नवीन अपडेट
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना चे सामान्य प्रश्न
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना :- visit this official website |

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना कोणासाठी आहे :-
Ladaki Bahin Yojana In Marathi महाराष्ट्र शासनाने आपल्या राज्यातील आर्थिक दृष्ट्या असक्षम असणाऱ्या महिला आणि मुलीसाठी हि योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. जेणेकरून या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या रक्कमेच्या मदतीने त्या स्वतःची व काही प्रमाणात कुटुंबाची काळजी घेऊ शकतील.
योजनेचा उद्देश :-
आपल्या राज्यातील महिलांना व मुलींना आर्थिक स्वातंत्र्य मिळावे, कुटुंबातील निर्णायक भूमिका सक्षम व्हावी, राज्यातील आर्थिक दुर्बल असणाऱ्या महिलांना त्याचे आरोग्य आणि पोषण करता यावे,त्याचप्रमाणे त्यांना स्वतःचा छोटासा व्यवसाय करता यावा या सर्व उद्देशाने महाराष्ट्र शासनाने “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” चालू केली आहे.
लाडकी बहिण योजनेसाठी पात्रता :-
१) या योजनेसाठी लाभार्थी महिला आणि मुली महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
२) राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला त्याचप्रमाणे प्रत्येक कुटुंबातील फक्त एक अविवाहित महिला पात्र असतील.
३) लाडकी बहिण योजनेसाठी किमान २१ वर्षे तर कमाल ६० वर्षे होईपर्यंत पात्र
४) लाभार्थी महिला आणि मुलींचे आधार कार्ड लिंक असलेले बँक खाते असणे आवश्यक
५) तसेच लाभ घेणाऱ्या महिलांचे आणि मुलींचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे २.५ लाख पेक्षा कमी असणे आवश्यक
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना साठी कोण अपात्र आहे :-
१) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरतात.
२)ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे २.५ लाखापेक्षा जास्त आहे.
३) सरकारी कर्मचारी अपात्र
४) जे सेवा निवृत्तीनंतर निवावृत्तीवेतन घेत असणारे सर्व अपात्र.
५) सदर लाभार्थी महिला आणि मुलगी अन्य सरकारी योजनेचा दरमहा १५०० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त लाभ घेत असणाऱ्या अपात्र
६) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य राज्य किंवा भारत सरकारच्या अधिकारी पदरावर असणारे अपात्र
७) ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहेत असे अपात्र ( tractor वगळून )
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना लभासाठी लागणारी कागदपत्रे :-
१) लाभार्थी महिला व मुलीचे आधार कार्ड
२) रहिवासी प्रमाणपत्र
३) कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला
४) बँक पासबुक झेरोक्स प्रत
५) रेशन कार्ड
६) पासपोर्ट size फोटो
७) मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने चे हमीपत्र
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना साठी अर्ज कुठे करणे :-
Ladaki Bahin Yojana In Marathi या लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन प्रकारे अर्ज करता येतो.एक म्हणजे offline अर्ज करणे. यामध्ये अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका यांचाकडे सर्व कागदपत्रे घेऊन जाणे आणि आपला आधार कार्ड ragister मोबाईल घेऊन जाणे. दुसरा म्हणजे तुम्ही online अर्ज करू शकता.
लाडकी बहिण योजनेसाठी ‘नारीशक्ती दूत app च्या द्वारे apply करण्याची माहिती :-
Ladaki Bahin Yojana In Marathi प्रथम नारी शक्ति दूत App ला आपल्या मोबाईल किंवा laptop मध्ये इंस्टाल करून घेणे. त्यानंतर app चालू करून आपला mobile नंबरची नोंदणी करणे, जो मोबाईल नंबर ची नोंद केली आहे, त्यावर तुम्हाला OTP येईल. तो OTP ची नोंद केल्यावर तुम्हाला नवीन page दिसेल. त्यामध्ये पूर्ण नाव, इमेल आईडी, जिल्हा माहिती नोंद करणे.व अपडेट ऑप्शन वर click करा. पुढील page वर योजनेचा अर्ज दिसेल. त्यामध्ये सर्व माहितीची नोंद करणे. तसेच सर्व लागणारी कागदपत्रे फोटो काढून उपलोड करणे आणि शेवटी सबमिट ऑप्शन वर click करणे.
PM किसान योजना माहितीसाठी :- visit this website |
लाडकी बहिण योजनेचे फायदे :-
१) या योजनेच्या माध्यमातून आपल्या राज्यातील आर्थिक दृष्ट्या असक्षम महिलांना महिन्याला १५०० रुपये मिळणार आहेत.
२) निराधार महिलांना सक्षम होण्यास मदत
३) या योजनेचा लाभ हा मुलींनाही मिळणार आहे.
४) या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून २१ ते ६५ वर्षापर्यंतच्या महिलांना याचा लाभ मिळणार आहे.
५) या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना शिक्षणासाठी मोठी मदत होत आहे. मिळणाऱ्या रक्कमेच्या सहाय्याने त्या लागणारी पुस्तके, क्लास ची फीस, परीक्षा शुल्क इत्यादी शैषणिक गरजा पूर्ण करू शकतात.
६) मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतून मिळणारी धनराशी हि थेट लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात जमा होते. त्यामुळे त्यांना या पैशासाठी सारखे सरकारी कार्यालयात जावे लागत नाही.
७) या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण सुद्धा दिले जाते. जेणेकरून त्या मिळणाऱ्या रक्कमेच्या मदतीने छोटासा व्यवसाय चालू करू शकतील. व स्वतःची आर्थिक परिस्थिती बदलण्यास प्रयत्न करतील.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना चे परिणाम :-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना हि महाराष्ट्र सरकारची एक महत्वाची योजना आहे.हि योजना गेम चेंगर ठरू शकते. या योजनेचा या योजनेचा प्रभाव मतदानावर पडू नये यासाठी या योजनेवर तात्पुरती स्तगीती आली आहे. या योजनेच्या माध्यामतून लाभार्थी महिलांना वर्षाला १८००० रुपये दिले जात आहेत. म्हणजेच कि लाभार्थी महिला आणि मुलींना प्रत्येक महिन्याला १५०० दिले जात आहेत. त्यामुळे मिळणाऱ्या रक्कमेचा योग्य वापर करणे तेवढे गरजेचे आहे.
लाडकी बहिण योजनेचे नवीन अपडेट:-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना चा लाभ सर्व महिलांना घेन्या यासाठी कागदपत्रांमध्ये शिथिलता करण्यात आली आहे. त्यामुळे फक्त ठराविक कागदपत्र आवश्यक आहेत.तसेच वयोमर्यादाही वाढवण्यात आली आहे. पहिले कमाल वय हे ६० वर्षे होते. ते आत्ता ६५ वर्षे करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना चे सामान्य प्रश्न :-
१) लाडकी बहिण योजनेतून महिन्याला किती पैसे मिळणार आहेत ?
उत्तर :- या योजनेच्या लाभार्थी महिलांना महिन्याला १५०० रुपये मिळणार आहेत.
२) लाडकी बहिण योजना कोणासाठी ?
उत्तर :- या योजनेच्या माध्यामतून १८ ते ६० वर्षे वयोगटातील महिला यांसाठी हि योजना आहे. या योजनेतून आर्थिक दृष्ट्या कमजोर महिलांना सहाय्य दिले जाणार आहे.
३) मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ची मुख्य भूमिका काय आहे ?
उत्तर :- या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ची मुख्य भूमिका हि आपल्या राज्यातील मागासलेल्या महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देणे आहे.या योजनेतून लाभार्थी महिलांना १५०० प्रत्येक महिन्याला दिले जात आहेत.त्यामुळे त्यांना स्वतःचे आणि कुटुंबाचे पालन पोषण करण्यात सहाय्य होत आहे.
४) योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे कागतात ?
उत्तर :- आधार कार्ड, बँक पासबुक, हमीपत्र , लाभार्थी चा पासपोर्ट साईज फोटो इत्यादी.
५) मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना साठी KYC करणे गरजेचे आहे का ?
उत्तर :- हो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी KYC करणे अनिवार्य आहे.
६) लाडकी बहिण योजनेचा अर्ज मंजूर झाला कि नाही हे कसे तपासणे ?
उत्तर :- योजनेचा अर्ज स्थिती तपासण्यासाठी तुम्ही अधिकृत website तसेच नारीशक्ती दूत app वर check करू शकता.
७) मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना चे पैसे बँक खात्यात जमा झाले नाही तर काय करावे ?
उत्तर :- पैसे जमा झाले नाही तर तुम्ही १८१ या helpline call करून तुमची तक्रार दाखल करू शकता.
८) नारी शक्तीदूत app काय आहे ?
उत्तर :- हे app मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना साठी लाभार्थ्यांना अर्ज करता यावा यासाठी तयार करण्यात आले आहे.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” हि महाराष्ट्र राज्याची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या मार्फत महाराष्ट्रातील निराधार, ज्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत कमजोर आहे, अशा सर्व २१ ते ६० वय असणाऱ्या महिलांना या योजनेतून महिन्याला १५०० रुपये तर वर्षाला १८००० रुपये देण्यात येत आहे. त्याचबरोबर या महिलांना लाभार्थी महिलांना तीन घरगुती सिलेंडर मोफत देले जात आहेत. त्यसाठी सिलेंडर चे खाते हे महिलेच्या नावे असणे गरजेचे आहे. अशा विविध लोक कल्याणकारी योजना सरकार अमलात आणत असते.